Tuesday, September 3, 2013

काकनवाड्यातील त्र्यंबकेश्र्वराचे भक्तांनी घेतले दर्शन

काकनवाडा येथे श्रावणमासात मोठा उत्सव साजरा होत असतो. यावेळी येथील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवलिंगावर रुद्राभिषेक, बिल्वार्चन आदि कार्यक्रम संपन्न होतात. यावेळी जवळपासच्या परिसरातील सर्व लहान लहान गावागावातून दिंड्या पताका घेऊन वारकरी येत असतात. ते शिवनामात तल्लीन होवून महादेवाची पुजा अर्चा करतात.


श्रावण सोमवारी शिवभक्तांची गर्दी
काकनवाड्यातील त्र्यंबकेश्र्वराचे भक्तांनी घेतले दर्शन


काकनवाडा - अकोला बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काकनवाडा येथील त्र्यंबकेश्र्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवभक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली. जवळच्या पुर्णा, वान नदीवरुन पवित्र जल आणून भाविकांनी भगवान शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक, दुग्धाभिषेक करून बिल्वपत्र आणि फुले अर्पण करून मनोभावे पूजन केले. भाविकांच्या गर्दीमुळे काकनवाड्याला जत्रेचे स्वरूप आले होते. शिव भक्तांनीची ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. यावेळी किर्तन, भजन, महाआरती व तदनंतर शिवस्तुती म्हणण्यात आली. यावेळी गावातील तरुण मंडळींनी मंदिरात चोख व्यवस्था पाहिली. काकनवाडा ता.संग्रामपूर जि.बुलडाणा येथील त्र्यंबकेश्वर संस्थानमध्ये श्रावण महिन्यात हजारो भाविक दर्शनाकरीता येवून पुजा अर्चा करतात तसेच मनोकामना सिध्दीसाठी महादेवाला नवस बोलतात. हेतु सिध्दीस गेल्यावर अन्नदान करतात, तरी अगाध महिमा असलेल्या भोळ्या शंभु महादेवाच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घेवून जीवन साफल्याचा आनंद अनुभवावा असे आवाहन विश्र्वस्त मंडळ महादेव संस्थान, समस्त गावकरी मंडळी काकनवाडा बु. यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment